उमेदच्या महिला बचत गटांचे रूक्मिणी दीपावली प्रदर्शनास पंचायत समिती पंढरपूर येथे उस्फुर्त प्रतिसाद --------

रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री.प्रशांत काळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
पंढरपूर ----(विनोद पोतदार)
 
पंचायत समिती पंढरपूर , व उमेद   – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंढरपूर यांच्या वतीने दीपावली निमित्ताने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व फराळ यांचे विक्री प्रदर्शनाची सूरूवात पंचायत समिती प्रांगणात आज दिनांक २० ऑक्टोंबर २०२२ राजी   ग्राहंकाचा प्रदर्शना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
    सदर रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री.प्रशांत काळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शणामध्ये तालुका पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री प्रशांत काळे साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. सरडे साहेब,उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री,  गजानन सुतार सर,यांनी आज स्वःता सपत्नीक सॅाटला भेटी देऊन स्टॉलवरून खरेदी केली .


ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील होतकरू महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे प्रदर्शन पंचायत समितीच्या माध्यामातून आयोजित करण्यात आलेले आहे. उमेद अभियानातर्गत बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल व गुणवत्तापूर्ण वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उमेदच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यामध्ये २३०३ स्वयंसहायता गटाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध उपजीविकेचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत त्यामध्ये गटातील महिलांना खाद्यपदार्थ व इतर उपयोगी वस्तूंचे उत्पादन करत असतात. 
   यावेळी पंचायत समितीतील श्री. कृषी अधिकारी मोरे साहेब, विस्तारअधिकारी नलवडे साहेब, भुजबळ साहेब, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तांबोळी, माळी साहेब, वैद्य साहेब व इतर पदाधिकारी यांनी उत्पादनांची खरेदी केली व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सदर विक्री प्रदर्शनामध्ये महिला गटांनी उत्पादित केलेल्या रूचकर पापड, लोणचे, मसाले, पेढे, दीपावली फराळ, उटणे, शेवया इत्यादी चविष्ट पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 *या विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध होत असून ग्राहकांनी समाधान व्यक्त केले, सदर रुक्मिणी महोत्सवांमध्ये तालुक्यातील एकूण 53 समूह सहभागी झाले होते यामध्ये ५९ हजार रुपयांची विक्रि झाल्याचे समजते*  

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  तालुका अभियान व्यवस्थापक श्री. गजानन सुतार सर, तालुका व्यवस्थापक श्री समाधान खुपसे व उमेद तालुका टिम प्रभाग समन्वयक गणेश गुरव, देवल परचंडे, भास्कर कुसुमडे,
 सुरज ऐवळे, वैभव चव्हाण, अभिजीत अंगारखे, कृषी व्यवस्थापक दिपक कदम , अण्णा अवताडे , पशू व्यवस्थापक आकाश पवार, सर्व प्रभाग संघ व्यवस्थापक व
 इतर सर्व स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form