चला निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद आनंद लुटायला....पंढरपूर तालुक्यातील या गावाला

अस्सल गावरान संस्कृतीचे जेवण, राहण्यासाठी विश्रामगृह तर एक विलक्षण नैसर्गिक अनुभव देणार गाव चिंचणी 

पंढरपूर ---(विनोद पोतदार)
सोलापूर जिल्ह्यात एक हरीतमय एक छोटेसे गाव कन्हेरी धरण बांधताना विस्थापीत होते.ते पंढरपूरच्या माळरानावर.. परंतु गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा विडा जर गावातील लोक उचलत असतील तर  एकीच्या बळावर सर्व र्चिंचणीवासीयांनी दाखवून दिले आहे कि आपल्या श्रमाच्या बळावर उजाड माळरानावर हजारो झाडे लावून प्रती स्वर्ग तयार करता येतो.यासाठी मोहन अनपट यासारख्या धडपडया सरपंचाने पुढाकार घेऊन गाव  हे सोलापूर जिल्ह्यात एक हरीतमय गाव म्हणून तयार केले आहे
या गावाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे.महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यात हिवरेबाजार व राळेगणसिद्धी हि दोनच गावे रोल माँडेल म्हणून ओळखली जातात. परंतु आता महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याची मान उंचवण्याचा मान पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाने मिळवला आहे.
    

     या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालय, गावाचापरीसर,स्मशानभुमी हिरवीगार करण्यासाठी लावण्यात आलेली वनराई तसेच बचत गटाच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेले  पर्यटन केंद्र तर अस्सल गावरान संस्कृतीचे जेवण, राहण्यासाठी विश्रामगृह तर एक विलक्षण अनुभव देणारे आहे. गावात कोणत्याही सणाला अथवा कार्यक्रमाच्या निमित्ताने फटाके फोडले जात नाहीत हे एक चांगले पाऊल गावकऱ्यांने उचलले आहे. गावात चिंच,पेरू ,आवळा, आंबा, सिताफळ,अंजीर नारळ,जांभूळ अश्या विविध देशी झाडांनी परीसर फुलुन गेला आहे. तसेच अनेक जातीचे पक्षी याला लागलेली फळे खाऊन मस्त शिट्टी वाजवत आपले जिवन अतिशय आनंदाने जगत आहेत. या गावात गेल्यावर आपल्याला परत येऊ वाटत नाही अश्या प्रकारचे अतिशय अल्हाहदायक वातावरण आहे.जर आपणास या स्वर्गासारख्या सुखाचा अनुभव द्यायचे असेल तर एकवेळ आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांस या ठिकाणी भेट देऊन जिवनातील परमोच्च सुख घेण्याचा अनुभव घेऊ शकता. चला तर आपण पुणे -पंढरपूर रोडवरील  फक्त पंढरपूर पासून  20किमी अंतरावर असणाऱ्या चिंचणी गावाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form