*खंडग्रास सूर्यग्रहण*
२५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण
*आश्विन कृष्ण ३० शके १९४४ मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत.*
*पंढरपूर येथे ग्रहण स्पर्श दुपारी ०४ वाजून ५५ मिनिटांनी असून, ग्रहणमध्य सायंकाळी ०५ वाजून ४९ मिनिटांनी आहे. तसेच पंढरपूर येथे सूर्यास्त सायंकाळी १८ वाजून ११ मिनिटांनी आहे.मात्र ग्रहणमोक्ष हा सायंकाळी १८ वाजून ३० मिनिटांनी आहे. अर्थातच सूर्यास्तानंतर २९ मिनिटांनी ग्रहणमोक्ष असल्यामुळे खगोल प्रेमींना पंढरपूर येथून ग्रहण मोक्ष पाहता येणार नाही. ग्रहण कालावधी एक तास मिनिटांचा आहे. ग्रहण मोक्षानंतर स्नान केल्यानंतर रात्री भोजन करू नये. बुधवारी सकाळी सूर्य दर्शनानंतर भोजन करण्यास हरकत नाही.*
*कर्क,तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना हे ग्रहण अनिष्ट फलदायी असल्याने या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये. पुरोगामींनी पाहून संशोधन करण्यास हरकत नाही.* तसेच ग्रहणानंतर केलेले दान शतपटीने आपणास परत मिळते, हेही संशोधन करण्यास हरकत नाही.
कर्क,तुला, वृश्चिक आणि मीन या राशी सोडून अन्य आठ राशींनी ग्रहण पाहण्यास हरकत नाही.कारण या ग्रहणाचे त्यांना शुभफलदायी परिणाम आहेत.
*नरक चतुर्दशीला सोमवारी अभंगस्नान केल्यानंतर आपल्या पायाखाली कडू शेन्नी, कारंटे, चिरोटे वा कडू दोडका चेंगरून, त्याचा रस चाटण करून,ते दक्षिणेला फेकून द्यावे वा त्वचेला लावावे, अशी आयुर्वेदिक व धार्मिक मान्यता आहे.त्यामुळे त्वचाविकार व पित्तविकार कमी होतात असा अनेक ज्ञातींचा अनुभव आहे.*
*अमावस्या सोमवारी संध्याकाळी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी लागत असल्याने लक्ष्मीपूजन सोमवारी संध्याकाळी करण्यास हरकत नाही. तसेच सोमवारी शेतातील जलदेवता व क्षेत्रदेवता पूजन करण्यास हरकत नाही. सोमवारी शक्य न झाल्यास बुधवारी सकाळी जलदेवता व क्षेत्र देवता पूजन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शेती व्यवसायात सहसा नुकसान येत नाही.*
*या दीपोत्सवामध्ये रासायनिक साबणांचा वापर करण्यापेक्षा, खोबरेल तेल व उटणे लावून, कोरफड वा कडूलिंब घालून गरम केलेल्या पाण्याने स्नान केल्यास त्वचा विकार उद्भवत नाहीत वा त्वचा विकारांचा निपटारा होतो. तसेच एलईडी दिव्याकडे पाहण्याने नेत्र विकार उद्भवतात, मात्र तुपाच्या दिव्याकडे पाहण्याने नेत्रविकारांचा खात्मा होतो, हे नक्की! त्यामुळे या दिवाळीमध्ये धनत्रयोदशी ते यमद्वितीयेपर्यंत सलग पाच दिवस किमान वीस मिनिटे तुपाच्या दिव्याकडे त्राटक करून नामजप साधना केल्यास अनेक विकारांचा खात्मा होतो, असा अनेकांचा अनुभव आहे.*