ऊस तोडीच्या हंगामावर याचा परिणाम होणार का शेतकरी चिंतेत
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसात ऐन दिवाळीच्या तोंडावर पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी, व्यापारी ,उद्योजक हवालदिन झालेले आहेत, यातच भर म्हणून हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिवृष्टीच्या संदेश देण्यात आलेला आहे.
खरिपाची पेरणी झाल्यानंतर आता काढणीच्या दिवसात परतीच्या पावसाने थैमान घातलेला आहे त्यातच तालुक्यातील बऱ्याच साखर कारखानदाराने बॉयलर पूजन करून ऊस गाळपासाठी कारखाने सज्ज केले, बऱ्याच कारखान्याने दिवाळीचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला बरेच कारखान्याकडे ऊस तोडी करारामुळे ऊस तोडी कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध झाले असून थोड्या दिवसात ऊस तोडणी करण्याचे नियोजन कारखाने केलेले आहे
@@@ पंढरपुर तालुका आज
दि. 12/10/2022 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब- 13 मिमी
पट कुरोली 43 मिमी
भंडीशेगाव 29 मिमी
भाळवणी- 33 मिमी
कासेगाव - 45 मिमी
पंढरपूर- 35 मिमी
तुंगत- 00 मिमी
चळे- 19 मिमी
पुळुज 11 मिमी
आजचा एकूण पाऊस 228 मि.मी
------------------------------------
सरासरी पाऊस 25.33 मि.मी.
------------------------------------
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी त्यामुळे ऊस तोडी कामगारांना ऊस तोडी करण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी सोयीचे होत नसल्याने गाळप हंगाम हा वेळेवर सुरू होईल का नाही अशी शंका शेतकरी वर्ग मध्ये दिसून येत आहे .पंढरपूर तालुक्यांमध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस आधी पिकांचे लागवड मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शेतकरी सध्या चितेंत दिसून येत आहे. कारण अति पाण्यामुळे पिकावर रोगाचा परिणाम होतो आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम होतो.