पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सवद्यात विक्री भाव २०१₹दर मिळाला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पंढरपुरात येथे आज २०१ रुपये किलो दराने डाळिंब विक्री झाल्याळे गेल्या महिन्यापासून डाळिंबाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरन झाली होती पण आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सतीश कुमार अँड कंपनी या आडत दुकानांमध्ये भास्कर कसगावडे यांनी २०१ रुपये पर्यंत डाळिंबाचा सवदा विक्री करून चालू बाजारपेठेमध्ये विक्रमी दरामध्ये डाळिंब विक्री केली आज पंढरपूर बाजार समिती येथे डाळिंबाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली होती.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज डाळिंबाच्या दराने उसळी घेऊन २०१ रुपये झाली दुष्काळाच्या छायेमध्ये पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या डाळिंबाला मिळत असलेल्या या दराबद्दल शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला.पंढरपुर कृषी उत्पन्न बाजार समिती धान्ये, बेदाणा, कांदा, लिंबु, फळे, केळी, डाळींब, बोर, भाजीपाला व विडयाची पाने ड यांचे सौदे वेगवेगळे काढले जातात. सौद्या नंतर अनुज्ञप्तीधारी तोलारा कडुन वजने केली जातात व त्याप्रमाणे आडत्या शेतकरीपट्टी तयार करून विक्रेत्यास त्याच्या मालाची रक्कम अदा करतो. इतर शेतीमाला पैकी जनावरे व वैरण यांची विकी आपआपसातील वाटाघाटीने होते. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत आहे .
चौकट-
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त चांगला दर देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.दर चांगला देत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
भास्कर कसगावडे, पंढरपूर
सतीश कुमार अँड कंपनी
