महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा पुरस्काराने जि.प.प्राथमिक शाळा शेटे वस्ती नं.१चा गौरव

पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 26/9/2026 रोजी दु.2 वाजता जिल्हा सोसायटी कार्यालय पंढरपूर येथे माढा तालुक्याचे आमदार श्री अभिजीत आबा पाटील पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद देशमुख माजी जि. प. समिती सदस्य सुभाषराव माने, संतोष बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमात महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा पुरस्काराने जि.प.प्रथमिक शाळा शेटे वस्ती नं. १ चा गौरव करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पोतदार यांना हा पुरस्कार माजी जि.प.समिती सदस्य सभाष माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी जिल्हा कार्याकारी अध्यक्ष सुनील कोरे, तालुका अध्यक्ष रमेश खारे,प्रतिष्ठान अध्यक्ष सुभाष भोसले आयडॉल शिक्षक नागनाथ घाटूळे , राहुल शेटे, आप्पा शेटे, सिद्धेश्वर माने,सचिन धायगुडे ,पोपट कापसे, संजय हेगडे, टकलेमॅडम, बालाजी शिंदे आदी मान्यवर शिक्षक मंडळी उपस्थित होते.तसेच पतसंस्थेच्या वतीने आयोजित महात्मा फुले गुणवंत विद्यार्थी सत्कार,महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार,महात्मा फुले गुणवंत शाळा पुरस्कार, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक सत्कार नुतन केंद्रप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी आपला बहुमोल वेळ दिला याबद्दल सर्व शिक्षक बंधू भगिनींनीचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा व सत्कार समारंभ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटणारे असंख्य हात सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानले याप्रसंगी चेअरमन,व्हा चेअरमन व संचालक मंडळ पंढरपूर तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या पंढरपूर अध्यक्ष व कार्यकारी मंडळ पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती परिवार पंढरपूरच्या सर्व शिक्षक शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form