सांगोला प्रतिनिधी -
*श्री गणेश उत्सव आगमन व श्री संत गजानन महाराज यांच्या ११६ व्या संजीवन समाधी सोहळा निमित्त* दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी सांगोला तालुकास्तरीय संगीत एकल अभंग व गौळण गायन भजन स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये श्रुती स्वरा क्लासिकल म्युझिक अकॅडमी खर्डी मधील विद्यार्थिनी कु. श्रावणी नवनाथ माळी हिचा सांगोला तालुक्यामध्ये खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. व लहान गटामध्ये श्रवण नवनाथ माळी*यांनी द्वितीय क्रमांक मिळवला दोघांनाही सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन अभिनंदन शुभेच्छा दिल्या. हे *सख्खे *भाऊ-बहीण मुळगाव *देवळे तालुका सांगोला* येथील रहिवासी असून या स्पर्धेमध्ये *परीक्षक* म्हणून ह.भ.प. श्री वैभव केंगार सर संगीत अलंकार व ह.भ.प. श्री. माऊली खरात एम ए म्युझिक तबला अलंकार यांनी काम पाहिले. तबलावादक. श्री विनायक कोळेकर. मार्गदर्शक शिक्षक. ह.भ.प. रामदास (नाना) रोंगे सर संगीत अलंकार व ह.भ.प. श्री धनंजय रोंगे सर एम ए म्युझिक तबला अलंकार व ह. भ.प. मच्छिंद्र कोळेकर, ह.भ.प. सुधाकर कुंभार गुरुजी ह.भ.प. पोपट बंडगर गायन साथ. श्रवण माळी, नवनाथ माळी टाळ. श्री. चिंतामणी खांडेकर श्री. सिद्धेश्वर कुंभार, आई सौ.वंदना माळी यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक. सोमेश यावलकर सर व अतुल उकळे सर व गणेश उत्सव तरुण मंडळ वज्राबाद पेठ सांगोला यांनी केले होते. या यशाबद्दल उपस्थित भजन मंडळ व श्री गणेश तरुण मंडळ सांगोला, जय हनुमान भजनी मंडळ देवळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..
