पंढरपूर प्रतिनिधी--
राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार म्हणून मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संधात गाव भेट दौरा आजपासून करणार आहेत.
गाव भेट दौरा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदैवत सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन सुरू होणार आहे. पुढे सायंकाळी ६ वाजता तपकिरी शेटफळ, रात्री ७ वाजता तनाळी, रात्री ८ वाजता तावशी, शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सिद्धेवाडी, सकाळी ९ वाजता शिरगाव, १० वाजता एकलासपुर, सायंकाळी ५ वाजता अनवली, सहा वाजता रांजणी, ७ वाजता मुंढेवाडी ८ वाजता गोपाळपूर, शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उंबरगाव, सकाळी ९ वाजता बोहाळी, १० वाजता कोर्टी, सायंकाळी ५ वाजता टाकळी, ७वाजता गादेगाव, रविवार दिनांक६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी
८ वाजता शिरढोण, ९ वाजता कवठाळी, सायंकाळी ६ वाजता वाखरी, सायंकाळी ७ वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे. यादरम्यान मनसेनेचे दिलीप बापू धोत्रे जनतेशी हितगुज साधून समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेशी नाळ जोडली आहे.तसेच ते सातत्याने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे.पंढरपुर शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चा माध्यमातून प्रशासन योग्य प्रकारे नियोजन करावे असे काम त्यांनी केले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचे मोठे आवाहन विरोध यांच्या समोर असणार आहे.
Tags
राजकीय वार्ता