मानाचा एकलव्य पुरस्कार विजेते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर पंढरीत...

सुदृढ शरीर बनवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे -- सुनील आपटेकर बेळगाव
पंढरपूर प्रतिनिधी--
सध्याच्या धाकदुखीच्या जीवनशैलीत शरीराकडे युवकांचे दुर्लक्ष होत आहे नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर व मन सुदृढ होते.नवयुवकांना शरीर सौष्ठवतेची आवड निर्माण करण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे.युवा पिढीने नियमित व्यायाम करून योग्य व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला घेणे गरजेचे आहे असे मत पत्रकारांशी संवाद साधताना मिस्टर आशिया, मिस्टर इंडिया  तीन वेळा व एकलव्य पुरस्कार विजेते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर बेळगाव यांनी केले आहे.

यावेळी बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांचा
भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रभारी अक्षय वाडकर, तात्या महाराज साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आज पंढरपूर येथे तात्या साळुंखे महाराज यांच्या निवासस्थानी ते आले असता युवकांनी व्यायाम करून शरीर सुदृढ करणे गरजेचे आहे.तसेच व्यसना पासून दूर राहून  समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या व्यसनाधीन असणाऱ्या युवकांना व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना व्यायाम व आहार याचा समतोल राखून तन आणि मन सुदृढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवून आपल्या उत्तम करिअर घडवण्याची संधी युवकांना व्यायाम या प्रकारातून मिळू शकते.
 
गेली अनेक वर्षापासून मी अनेक कॉलेज शैक्षणिक संस्था येथे भेट देऊन नव्या पिढीतील युवा युवतींना व्यायाम करण्या
बाबत योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम करीत आहे.त्याच निमित्ताने मी आज पंढरपूर येथे आलो आहे .सर्वात उच्च मानला जाणारा एकलव्य पुरस्कार विजेते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी नव पिढीतील युवकासमोर आदर्श निर्माण केलेला आहे.
 
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रभारी अक्षय वाडकर, तात्या महाराज साळुंखे ,अर्जुन महाराज जाधव, मुकेश लकेरी, आबासाहेब जगताप, किशोर झेंड, प्रदीप साळुंखे, युगंधर साळुंखे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form