कोर्टी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मुन्ना जमाल शेख यांची निवड

पंढरपूर/प्रतिनिधी
 पंढरपूर तालुक्यातील कोटी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मुन्ना जमाल शेख यांची निवड.पंढरपूर तालुक्यातील कोटी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली.यामध्ये सत्ताधारी पार्टी कडून मुन्ना जमाल शेख यांचा  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 
तर विरोधी पार्टी कडून सौ.सुमन किसन व्हनकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

या झालेल्या अटीतटीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पार्टीचे मुन्ना जमाल शेख यांना ८ मते तर सौ.सुमन किसन व्हनकडे यांना ७ मते मिळाल्याने उपसरपंचपदी सत्ताधारी पार्टीचे मुन्ना जमाल शेख यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी . यु कदम यांनी जाहीर केली.यानंतर सत्ताधारी पार्टीचे नेतेमंडळींनी मुन्ना जमाल शेख यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सत्ताधारी गटाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कोर्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेख यांच्या समर्थकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत फटाक्याची अतिशय बाजी आणि  गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form