पंढरपूर व मोहोळ आगारातून -तिर्हे मार्गे एस टी बस वाहतूक नियमित व सुरळीत करा--कु.प्रियंका परांडे

अन्यथा येत्या आठ दिवसांत ग्राहक समीतीच्या वतीने तिव्र आंदोलनचा  इशारा....
पंढरपूर प्रतिनिधी ---
पंढरपूर आगार व मोहोळ आगार येथून तिर्हे मागें एस.टी. बस  नियमित व सुरळीत सुरू करावी यासाठी कु्.प्रियंका परांडे प्रदेशाध्यक्ष महिला अध्यक्ष ग्राहक समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विभागीय नियंत्रक सोलापूर विभाग(म.रा.प) यांना ग्राहक समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले .

 
पंढरपूर येथुन तिर्हे मार्गे रोडवरील सदर गावातील नागरिक अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे यामध्ये  फुलचिंचोली, सुस्ते, तारापूर, अर्जुनसोंड,पोहोरगाव, पुळूज, मगरवाडी, देगांव, औंढी, अंकोली, कुरुल, कामती, कोथाळे इ. गांवामधून  विद्यार्थी, पालक, नोकरवर्ग, शेतकरी तसेच महिला वर्ग यांना येणे जाण्यासाठी ग्रामीण भागातील एकमेव सुखकर व खिशाला परवडणारी वाहतूक व्यवस्था म्हणजे एस.टी
महामंडळकडे बघितले जाते.काही वेळा असे प्रसंग घडलेले आहेत की, प्रसुती पेशंटला एस.टी. ची वाट पाहून अनावधानाच्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक वयोवृध्द व्यक्तिंना विद्यार्थ्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.थंडीच्या दिवसात बसेसला व्यवस्थित खिडकी व त्यांस असणारे  काचेचे दरवाजे  सुस्थित  नसल्याने आरोग्याचा धोका देखील होऊ शकतो. बसेस वेळेत व नियमित तर सोडाव्याच परंतू त्याचबरोबर त्याची दुरुस्ती व गुणावत्ता याकडे लक्ष देण्यात  यावे असे निवेदनात म्हटले आहे.तसेच या निवेदानाचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा येत्या आठ दिवसांत सुरळित व्यवस्था न झाल्यास संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी ग्राहक समिती संस्थापक अध्यक्ष  तानाजी गुंड, ग्राहक समिती महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका परांडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ,सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष मंगलताई नाईकनवरे, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा भोसले,मोहोळ तालुकाध्यक्ष बबन नरोटे,मोहोळ तालुका उपाध्यक्ष किसन गायकवाड आदी मान्यवर, नागरिक उपस्थित उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form