पंढरपूर येथील पत्रकार परिषदेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे वक्तव्य.
पंढरपूर /प्रतिनिधी
केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार चांगले काम करत असून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना कार्यान्वित करत आहे.
सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकार महत्वाचे निर्णय घेत असल्याने २०२४ ला एनडीए सरकारला ३५० हून अधिक जागा मिळतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
समान नागरी कायद्यामुळे एससी,एसटी व इतर रिझर्वेशनवर कोणताही परिणाम होणार नाही.
हा कायदा अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही तरी देखील विरोधकांकडून याचा वापर हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचे वक्तव्य
त्यांनी पंढरपूर येथील आरपीआयच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता पत्रकारांची संवाद साधला.
यावेळी आरपीआयचे महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव सुनील सर्वगोड, बापूसाहेब जगताप, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष पवार,शहराध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड, मा. युवक आघाडी प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे,नंदकुमार केंगार, हनुमंत कसबे यांच्यासह जिल्हा, तालुका आणि पंढरपूर शहरातील आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार चांगले काम करत असून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना कार्यान्वित करत आहे.
सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकार महत्वाचे निर्णय घेत असल्याने २०२४ ला एनडीए सरकारला ३५० हून अधिक जागा मिळतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
राज्यातील सरकारने लवकरात लवकर सत्तेचे वाटप करावे.
आगामी निवडणुकीत दोन लोकसभेच्या जागा आरपीआय साठी सोडाव्या. अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
तत्पूर्वी सुरुवातीला त्यांनी चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
Tags
राजकीय